रात्री बाराचे स्वप्न

दोन दिवसापूर्वी पडलेलं विचित्र स्वप्न… हे ज्याचा बद्दल पडलं त्यालाच मेल लिहून कळवलं… तो मेल जशाचा तसा इथे देत आहे .

📨

Hey……विश दा !
कसा आहेस ??
काल माहित्ये मला खूप विचित्र स्वप्न पडलं . हे वाचून तू खूप हसणार आहे . 😀
आपण असं कधीच प्रत्यक्षात भेटलो नाही . पण काल मी तुला भेटले 😀 खरी गंमत तीच वाटते..असंही होऊ शकत 🙄
तुला ना एक मिरर आवडला होता . One side corner ला सनई चौघड्यांनी कोरलेला . खूप कोरीव काम वाटत होतं त्यावर . आणि पंढऱ्या पडद्याची वरून सजावट होती त्यावर . तू ठरवल की तो आपण घ्यायचाच . पण तुला तिथून जॉब वर जायचं होतं तर तू त्या दुकानदाराला सांगितलेलं की मी रात्री परतताना नक्की येतो.. 
आणि होतं काय मी पण त्या दुकानात जाते आणि मला तो मिरर दिसतो . मला पण खूप आवडतो.. तो दुकानदार मला सांगत असतो की तो मिरर आधीच बुकिंग आहे . तरी पण मी काही ऐकत नाही जास्त किंमत देऊन तो घेऊन जाते.. 
रात्री जॉब वरून तू परत त्याच दुकानात जातो . पण तो दुकानदार तुला सांगत असतो की तो मिरर एका मुलीने 500₹ extra देऊन घेऊन गेली आहे . 
तुला खूप वाईट वाटतं त्याच… घरी जाऊन तू हताश होऊन बसलेला असतो. तेवढ्यात तुझ्याकडे मी येते .. आणि येताच तुला लगेच म्हणते विश दा… तुझ्यासाठी सरप्राईज आहे . तुला कळतच नाही काय सरप्राईज असेल . आणि मी तोच मिरर रिक्षात तुझ्यासाठी आणलेला असतो 😂 तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव मी टिपत होते 😅आणि मग अशी खडपडून जाग येते मला .Watch मध्ये बघते तर 12 वाजलेले . परत उठते पाणी पिऊन झोपायला जाते.. मनात असाच विचार येऊन जातो . रात्रीचे बारा वाजता इतकं गोड स्वप्न पडलं 😄आणि ते पण ना तुला इतक्यात मेल केला . ना तुला कधी भेटले . तरी स्वप्नात तुझ्या सोबत बोलत होते असं प्रत्यक्षात काल तुला भेटल्या सारखं वाटतं होतं.पण खूप हसायला आलं ह्या स्वप्नावर …  कारण मी स्वप्नात कधीच कुणाला असे भेटले नाही . 
असं म्हणतात जगात पाच माणसं आपल्या स्वभावाची आपल्या सारखी असतात . त्यातला तू एक माझ्या स्वभावासारखा असणारा वाटतो. पण आपली भेट का झाली असेल विश दा ?? काहीतरी ना connection असलं पाहिजे.. कि निव्वळ योगायोग . 

📩

Hello my little sister….

भारी स्वप्न पडलं की… तुला भेटण्याची कल्पना करून चेहऱ्यावर आपसूक हसू आले. तो आरसा, आरश्यासोबतची तू दिसलीस..
कदाचित आपण आयुष्य एकाच प्रतिबिंबातून पाहतो ना म्हणून पडले असेल हे स्वप्न. कनेक्शन नक्की असावं असं वाटतं. आणि योगायोगच असेल तर तो आपल्या एकाच स्वभावशैलीमुळे आपल्याकडून घडणाऱ्या छोट्या छोट्या actions मुळे हळूहळू आपण जवळ येत राहतो आणि कधीतरी भेटतो.. बोलतो.. मैत्री होते… टिकली तर आपल्यासारखं खोलवर रुजणारं नातं तयार होतं. मला हे नेहमी वाटते, की आपलं नातं आता खूप व्यवस्थित रुजलेय. तुझ्याविषयीचा जिव्हाळा असा आतून येतो.
तुझा
दादा…🦚💙